Latest News

Latest News
Loading...

युवा शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून केली आत्महत्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

शेतातच विष प्राशन करून कास्तकाराने आत्महत्या केल्याची घटना काल २२ नोव्हेंबरला शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाबापुर या गावात घडली. नैराश्येतून कास्तकाराने जीवनाचा शेवट केला. प्रशांत अण्णाजी निब्रड (४५) असे या मृत्यूला कवटाळलेल्या कास्तकाराचे नाव आहे.

तालुक्यातील बाबापुर या गावात परिवारासह वास्तव्यास असलेल्या कास्तकाराने विवंचनेतून आपल्या शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. नेहमी प्रमाणे शेतात गेलेला कास्तकार बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितले असता तो विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आज शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

युवा शेतकऱ्याने नैराश्येतून जीवनाचा शेवट केला. प्रशांत निब्रड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी शानू निब्रड (३५), मुलगा यश निब्रड (१८), आदित्य निब्रड (१६) असा आप्त परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या कास्तकाराने असा हा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत निब्रड यांच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महायतेचे कारण अद्याप अस्पष्ट असून शिपुर पोलिस त्यांच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास शिरपूर पोलिसांकडून केला जात आहे. 

No comments:

Powered by Blogger.