गणेशपूर ग्रामपंचायत येथे पार पडला विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ सोहळा
प्रशांत चंदनखेडे वणी
केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा ग्रामीण जनतेला लाभ घेता यावा म्हणून शासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ सोहळा २८ नोव्हेंबरला गणेशपूर ग्रामपंचायत येथे घेण्यात आला. वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर ग्रामपंचायत येथे पंचायत समितीच्या माध्यमातून या विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामीण जनतेला व लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याकरिता बूथ लावण्यात आले होते. या विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ सोहळ्याला भारत सरकारचे सह सचिव आनंदराव पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितिन इंगोले, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, गटशिक्षण अधिकारी काटकर, नायब तहसीलदार कापसीकर, तालुका कृषी अधिकारी सुशांत माने, सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एन. जाधव, ग्रामसचिव मिलिंद माने, गणेशपूरच्या सरपंच आशा जुनगरी तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तालुका आरोग्य विभाग, कृषी विभाग, मरेगा विभाग, स्वच्छ भारत मिशन विभाग, शिक्षण विभाग तथा विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच आयडीयूस, उमेद, ग्रामपंचायत संघ, व बचत गटाचे सर्व कर्मचारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण जनतेला व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता बूथ लावण्यात आले होते. ग्रामीण जनतेसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व या योजनांचा लाभ घेण्याकरिता शासनाकडे अर्ज करतांना द्यावी लागणारी कागदपत्रे याबाबत सखोल माहिती देण्यात आली. शासनाच्या योजनांपासून अद्यापही लाभार्थी अनभिज्ञ आहेत. त्यांना शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्याने ते त्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामीण जनता व लाभार्थी शासकीय योजनांचा लाभ मिलण्यापासून वंचित राहू लागले आहे. जनतेला सक्षम व समर्थ करण्याकरिता शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहे. पण या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचत नसल्याने त्यांना या योजना कळत नाही. त्यामुळे शासनाने विकसित भारत संकल्प यात्रा सुरु केली आहे. या संकल्प यात्रेचा शुभारंभ सोहळा गणेशपूर ग्रामपंचायत येथे आयोजित करून ग्रामीण जनतेला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment