मेघदूत कॉलनी येथिल सम्यक बुद्ध विहारात संविधान दिन साजरा


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहर व तालुक्यात ठिकठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दीना निमित्त आयोजित कार्यक्रमात संविधान निर्माता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील मेघदूत कॉलनीतही संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मेघदूत कॉलनी येथिल सम्यक बुद्ध विहारात संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद बहादे होते. तर कार्यक्रमाला महादेव भालशंकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान लिहून लोकशाही प्रधान देश निर्माण केला. देशवासियांना कायद्याची चौकट दिली. सर्व नागरिकांना सामान अधिकार देणारा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्याचं कार्य संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी देशात समानता प्रस्थापित करण्यात घालवलं. अस्पृष्यता निर्वाणाकरिता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. जाती भेदाच्या शृंखला तोडण्याकरिता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. जाती भेदाच्या दलदलीत खितपत पडलेल्या समाजाला त्यांनी सन्मानाचं जिणं बहाल केलं. जातीभेद पाळला जाऊ नये याकरिता त्यांनी कायद्यातही तरतूद केली. २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक लिखाण करून त्यांनी देशाचं संविधान लिहिलं. त्यात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचा समावेश करण्यात आला, हे विचार महादेव भालशंकर यांनी संविधान दिनाच्या या कार्यक्रमातून व्यक्त केले. विनोद बहदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्दांचा अर्थ प्रत्येक्षात समजावून सांगितला. तसेच भारत हा सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश असून भारतीय राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असल्याचं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. 

कार्यक्रमादरम्यान २६/११ ला शहिद झालेल्या भारतीय जवानांना उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.  कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सचिन वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कवडू पाटील, हरीश वासेकर, अनिल पाटील, सौरभ बहादे, संगीता वाघमारे, लिलाबाई वासेकर, उषाताई बारशिंगे, सुचिता पाटील, वंदना भालशंकर, सरला बहादे, मेघा बारशिंगे, प्रियंका वानखेडे, मेघा कोयरे, तामगाडगे ताई, ठमके ताई, करमनकर ताई, जयश्री धोटे, प्रणिता वासेकर, नीता बहादे, भाग्यश्री शंभरकर, हर्षु गोहने आदींनी परिश्रम घेतले.. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी