आनंदाने उजळून दीप काळोख दूर सारूया, दिवाळीचा सण सर्व मिळून साजरा करूया, दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्याला सहकार क्षेत्राचा वारसा लाभला आहे. सहकार क्षेत्राने वणी तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावलं आहे. सहकार क्षेत्राच्या प्रगतीत पतसंस्थांचाही सिंहाचा वाटा राहिला आहे. पतसंस्थांमुळे आज तालुक्याला आर्थिक संपन्नता लाभली आहे. जनतेला वेळोवेळी आर्थिक सहाय्यता मिळाली आहे. व्यवसायीक व कास्तकारांना पतसंस्थेच्या माध्यमातून सहज कर्ज उपलब्ध झालं आहे. तालुक्यात पतसंस्थांचं जाळं पसरलं असून तालुक्याला आर्थिक समृद्धता मिळवून देण्याचं काम पतसंस्थांनी केलं आहे. मागील काही वर्षात नव्याने अनेक पतसंस्था सुरु झाल्या. पण शहरातील श्री रंगनाथ स्वामी निधी अर्बन लिमिटेड ही वाऱ्याच्या वेगाने प्रगती साधू लागली आहे. अल्पावधीतच या सहकारी पतसंस्थेने जनतेचा विश्वास संपादन केला असून या पतसंस्थेची श्री लक्ष्मीनारायण ही शाखाही सुरु झाली आहे. या दोन्ही शाखेकडे गुंतवणूकदार व ठेवीदारांचा कल वाढू लागला आहे.
श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लि. व श्री लक्ष्मीनारायण या पतसंस्थेच्या माध्यमातून जनतेला मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. अर्बन निधी लि. चे अध्यक्ष संजय खाडे यांच्या स्वभाव गुणामुळॆ ग्राहक या दोन्ही पतसंस्थांशी जुळू लागले आहेत. संजय खाडे हे एक दानशूर व्यक्तिमत्व असून सामाजिक जाणीव जपणारी त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांचे चिरंजीव अर्बन निधी लि. चे उपाध्यक्ष असून त्यांच्या अर्धांगिनी संगीताताई या लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्षा आहेत. सामान्यातून असामान्य झालेलं हे कुटुंबं सर्वसामांशी मात्र आपुलकीची भावना ठेवत असल्याने ग्राहकांचा ओढा या पतसंस्थांकडे वाढतांना दिसत आहे. सामाजिक जाणीव जपतांनाच विविध सामाजिक उपक्रम व गरजू, गरीब, दुर्बल घटकांना वेळोवेळी आर्थिक सहकार्य करणाऱ्या संजय खाडे परिवाराकडून वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला तथा ठेवीदार, गुंतवणूकदार, कर्जदार, भांडवलदार व सभासदांना दिवाळी या आनंदमय सणाच्या खूप खूप शुभेच्छा.दिवाळी या सणाला आनंदाची उधळण होऊ द्या, तुमच्या डोळ्यात आम्हाला आमचा आनंद पाहू द्या ! दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- संजय खाडे अध्यक्ष श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लि., संगिता संजय खाडे अध्यक्ष श्री लक्ष्मीनारायण ना. सह. पतसंस्था, ईश्वर खाडे (इलेक्ट्रिकल इंजि.), धनंजय खाडे (सिव्हिल इंजि.)
No comments: