शिंदोला शेत शिवारात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, सहा आरोपी अटकेत व ३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील शिंदोला शेत शिवारात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकून कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळणाऱ्या ६ आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी ३ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही १ डिसेंबरला करण्यात आली.
शिंदोला-कळमना रस्त्यावर शेत शिवारात कोंबड बाजार भरवला जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे लोकांची मोठी गर्दी दिसून आली. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्या ठिकाणी धाड टाकली. कोंबडे भांडविणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. तर घटनास्थळावरून सहा दुचाकी व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अंकुश कवडू गोहकर, विलास महादेव मरसकोल्हे, सुरेश बाबाराव वाबेटकर, गुजरात भास्कर थेरे, विनोद हरिदास येडे, अजित रमेश दुबे यांचा समावेश असून या सहाही आरोपींवर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार संजय राठोड, पीएसआय राम कांदुरे, सुनील दुबे, प्रशांत झोड, निलेश भुसे, गुणवंत पाटील यांनी केली.

No comments: