प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरालगत असलेल्या नविन वागदरा येथे सार्वजनिक खुल्या जागेवर सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळणाऱ्या चार जुगाऱ्यांना अटक केली आहे. ही कार्यवाही आज ७ डिसेंबरला सायंकाळी ६.५८ वाजताच्या सुमारास करण्यात आली. नविन वागदरा येथिल माऊली मंदिरासमोरील सार्वजनिक खुल्या जागेवर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती एपीआय दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना तेथे काही इसम पत्त्याचा जुगार खेळतांना दिसले. त्यांनी मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकून गंजी पत्त्यावर पैशाची हार जीत खेळणाऱ्या चार जणांना रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून पोलिसांनी २१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नविन वागदरा येथे गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळाला जात असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. माऊली मंदिराजवळ असलेल्या राजेश मेश्राम यांच्या घरासमोरील सार्वजनिक खुल्या जागेवर काही इसम पत्त्याचा जुगार खेळतांना पोलिसांना रंगेहात सापडून आले. गंजी पत्त्यावर एक्का बादशाह नावाच्या जुगारावर पैशाची हार जीत खेळणाऱ्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून २१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अवि वामन पाचभाई (२६), तेजस संजय देठे (२२), रितेश संजय पंडिले (२६), राजेश ज्ञानेश्वर मेश्राम (३४) सर्व रा. नविन वागदरा यांचा समावेश असून त्यांच्यावर मजुका च्या कलम १२ (अ ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून सपोनि दत्ता पेंडकर, पोकॉ वासिम शेख, गजानन कुडमेथे, ललित यांनी केली.

No comments: