Latest News

Latest News
Loading...

आर.सी.सी.पी.एल. कंपनीने राजूरगोटा या गावात उभारले जल शुद्धीकरण केंद्र, नुकताच पार पडला लोकार्पण सोहळा

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी उपविभागातील मुकुटबन येथे असलेल्या आर.सी.सी.पी.एल. कंपनी कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून कार्य क्षेत्रातील गावांमध्ये सर्व सोइ सुविधा पुरविल्या जात आहे. विविध योजनांमधून गावकऱ्यांचे हित साधले जात आहे. या कंपनीच्या सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख असलेले जयंत कंडपाल यांच्या मार्गदशनातून कंपनीच्या कार्य क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 

राजूरगोटा या गावातील गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कंपनीने सोडविला आहे. गावात जलशुद्धीकरण यंत्र बसवून गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावात जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना विविध आजारांची लागण व्हायची. दूषित पाण्यामुळे ते नेहमी आजारी पडायचे. आरोग्य निरोगी ठेवण्याकरिता शुद्ध पाणी पिणे गरजेचे असते. परंतु जलशुद्धीकरण केंद्राअभावी त्यांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळत नव्हते. त्यामुळे या गावातील नागरिकांनाही पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर.सी.सी.पी.एल. कंपनीने या गावात जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. 

या जलशुद्धीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन कंपनीचे युनिट हेड जयंत कंडपाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कारकर्ते विलास खडसे हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रिष्णकुमार राठोड, दीपक ठाकरे, तेजप्रताप त्रिपाठी, मधुकर मुन, विजय कांबळे यांची उपस्थिती लाभली. जयंत कंडपाल यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, गावात जलशुद्धीकरण केंद्राची नितांत आवश्यकता असून पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून गावात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य सेविका भावना वराटे यांनी तर आभार प्रदर्शन सपना काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्ञानेश्वर घाटे, आदित्य मटकर, शिवम यांनी सहकार्य केले. 

No comments:

Powered by Blogger.