शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वात वाहन चालकांनी केले आंदोलन, आणि वेकोलिने मान्य केल्या मागण्या



प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रात वेकोलिशी संलग्न असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये वाहन चालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शिवसेना नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वेकोलिचे अधिकारी व वाहतूकदार कंपनी मालकांचे चांगलेच धाबे दणाणले. त्यांनी यापुढे चालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे आश्वासन देत वाहन चालकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आंदोलनाचा कुठलाही गाजावाजा न करता संजय देरकर यांनी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून चालकांची होणारी पिळवणूक दूर केली. तसेच खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या व वेकोलि कडून चालकांच्या सर्व मागण्या मान्य करून घेतल्या.

ट्रॅव्हल्स कंपन्यांनी वेकोलीशी वाहतुकीचा करार केला आहे. वेकोलिने खाजगी वाहतूक कंपन्यांना वाहतुकीचे कंत्राट दिल्याने वणी नॉर्थ क्षेत्रात खाजगी वाहनांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरु आहे. वेकोलि कर्मचारी व शाळकरी विद्यार्थ्यांना ने-आन करण्याकरिता खाजगी ट्रॅव्हल्स भाडेतत्वावर लावण्यात आल्या आहेत. या ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये येथीलच चालक नियुक्त करण्यात आले आहेत. पण या चालकांना शासकीय नियमानुसार वेतन व सुविधा दिल्या जात नाही. कंपनीकडून वाहन चालकाचं पूर्णतः शोषण केलं जात आहे. वेकोलिशी संलग्न असलेल्या या ट्रॅव्हल्स कंपन्या चालक व कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असून वेकोलि मात्र मूकदर्शक बनली आहे. वेकोलिने केलेल्या करारावर खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या वेकोलि क्षेत्रात प्रवासी वाहतूक करीत असतांना वेकोलि या कंपन्यांवर नियंत्रण न ठेवता कंपन्यांच्या अन्यायकारक धोरणाला पाठिंबा देत आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या या अन्यायकारक धोरणाला कंटाळून चालकांनी एकता असोसिएशन मोटार वाहन मदतनीस वेलफेअरचे संस्थापक अध्यक्ष संजय देरकर यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. त्यांनी एकता असोसिएशन मोटार वाहन मदतनीस वेलफेअरच्या माध्यमातून वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांना ट्रॅव्हल्स चालकांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. तसेच चालकांच्या मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला होता. त्यानुषंगाने २८ डिसेंबरला त्यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने वेकोलिचे अधिकारी व ट्रॅव्हल्स मालक चांगलेच वठणीवर आले. संजय देरकर यांच्या आंदोलनाची दखल घेत वेकोलि अधिकाऱ्यांनी चालकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वसन दिले. यापुढे चालकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचीही त्यांनी ग्वाही दिली. वेकोलिचे अधिकारी व ट्रॅव्हल्स मालकांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

संजय देरकर यांनी ट्रॅव्हल्स चालकांच्या व्यथा समजून घेत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केले. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. मुख्य महाप्रबंधकांकडून चालकांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून चालकाचं होणारं शोषण थांबविलं. आंदोलनाचा कुठलाही गाजावाजा किंवा दिखावा न करता वाहन चालकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर केला. संजय देरकर यांच्या नेतृत्वात चालकांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. शासकीय नियमानुसार त्यांना वेतन व अन्य सुविधा मिळणार असल्याने त्यांच्यामधून समाधान व्यक्त होतांना दिसत आहे. या आंदोलनात संजय देरकर यांच्या सोबत ट्रॅव्हल्स चालक व एकता असोशिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी