वयक्तिक कर्ज वाटप करणाऱ्या फायनान्शियल कंपनीत कर्मचाऱ्यांनीच केला ६ लाखांचा अपहार

प्रशांत चंदनखेडे वणी 

वयक्तिक कर्ज देणाऱ्या एका फायनान्शियल कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत फायनान्शियल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाने संबधीतांवर गुन्हे नोंदविण्याचे पोलिसांना आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी फायनान्शियल कंपनीच्या शाखा व्यवस्थापकासह तीन जणांवर कंपनीच्या रक्कमेत अफरातफर केल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. ही घटना १५ फेब्रुवारी २०२२ ते २५ एप्रिल २०२२ दरम्यान घडली. २७ व २८ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या तक्रारी वरून पोलिसांनी या अपरातफ़र प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. 

शहरातील एका अपार्टमेंटमध्ये भारत फायनान्शियल इंक्लूजन लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. ही फायनान्शियल कंपनी कर्जदारांना मर्यादित कर्ज वाटप करते. वयक्तिक कर्ज देणाऱ्या या फायनान्शियल कंपनीत तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच आर्थिक घोळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही फायनान्शियल कंपनी ईडसइंड कंपनीची उपशाखा आहे. या फायनान्शियल कंपनीच्या शाखा व्यवस्थापक व संगम मॅनेजर यांनी कंपनीच्या रक्कमेत अफरातफर करून रक्कमेची परस्पर विल्हेवाट लावली. भारत फायनान्शियल इंक्लूजन ली. या कंपनीत  वैभव किसन ठाकरे (२५) रा. सावळा पो. वडगाव जि. यवतमाळ हा शाखा व्यवस्थापक असून ऋषिकेश रामदास जांभुऱे रा. मदनी ता. बाभुळगाव जि. यवतमाळ हा या ठिकाणी संगम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. या दोन्ही आरोपींनी फायनान्शियल कंपनीत जमा असलेल्या २ लाख ९७ हजार ९५० रुपयांच्या रक्कमेची परस्पर विल्हेवाट लावली. कर्जदारांनी कर्जापोटी कंपनीत जमा केलेली रक्कम आरोपींनी आपल्या घशात घातली. तर दुसऱ्या प्रकरणात कंपनीतच कार्यरत असलेल्या अक्षय महादेव सिडाम (२२) रा. झटाळा ता. घाटंजी जि यवतमाळ याने ६४ कर्जदारांकडून वसूल केलेली ३ लाख ३ हजार ५४ रुपयांची रक्कम कंपनीच्या लॉकरमध्ये जमा न ती स्वतःच गिळंकृत केली. या तीनही आरोपींनी भारत फायनान्शियल कंपनीत ६ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. राजेंद्र धनराज दारुदासरे रा. दामले फैल वणी यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी तिनही आरोपींवर भादंवि च्या कलम ४०३, ४०६, ४०८, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी