वणी येथे २१ जोडप्यांचा सामूहिक निकाह, आमेर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून करण्यात आले आयोजन


प्रशांत चंदनखेडे वणी 

आमेर बिल्डर अँड डेव्हलर्सच्या वतीने जमीर खान यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत २१ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक निकाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक आशियाना हॉल येथे ३० डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता हा सोहळा होणार असून २१ जोडप्यांचा सामूहिक निकाह या सोहळ्यात लावून दिला जाणार आहे. जमीर खान यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून हा सामूहिक निकाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

या निकाह सोहळ्याला राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, म.रा. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसाहत मिर्जा, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, मनसे नेते राजू उंबरकर, शिवसेना नेते संजय देरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया, आम आदमी पार्टीचे नेते भाई अमन, वणी व्यापारी असो. चे अध्यक्ष राकेश खुराणा, श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, भाजपचे चंद्रपूर लोकसभा विस्तारक रवि बेलुरकर, फारुख चिनी यांची उपस्थिती लाभणार आहे. 

आमेर बिल्डर्स अँड डेव्हलर्सचे संचालक जमीर खान ऊर्फ जम्मूभाई याच्या सामाजिक उपक्रमातून आयोजित या निकाह सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता हाजी रफिक शेख इब्राहिम, रज्जाक पठाण, हाजी असलम चिनी, मो. एजाज, बबलू दिवाणजी, हाजी निसार अहेमद, हाजी ईसराईल खॉ शाबान खॉ, अकरमभाई, सुलेमान खान, हबीबभाई, शाहिद शमशेर खान, सैय्यद मतीन, डॉ. शाह अरशद ईकबाल, डॉ. सैय्यद अतिक, अशपाक खॉ, मेहबूब खॉ, अनवर हयाती, मुन्ना खान, साकिब ईकबाल खान आदी परिश्रम घेत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी