अंगणवाडी सेविकांनी शासनाकडून होणाऱ्या अन्यायामुळे केले जेलभरो आंदोलन, आंदोलनाला मनसेने दिला जाहीर पाठिंबा



प्रशांत चंदनखेडे वणी 

राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनात नाममात्र वाढ करून त्यांची एकप्रकारे थट्टा केली आहे. राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांची मनधरणी करण्याकरिता त्यांच्या मानधनात अत्यल्प वाढ केली असून तुटपुंज्या मानधनात त्यांना घर खर्च भागवणं कठीण झालं आहे. महागाईच्या या काळात त्यांना अतिशय कमी मानधनात राबवून घेतलं जात आहे. त्यांच्या मागण्यांना आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. शासन वेळोवेळी आश्वासने देऊन त्यांचं बोळवण करतांना दिसत आहे. शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांमध्ये कमालीचा असंतोष खदखदू लागला आहे. शासनाकडून होत असलेल्या अन्यायामुळे अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून जेलभरो आंदोलन केले. अंगणवाडी सेविकांनी शहरात आज भव्य मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर तेथे राज्य शासनाविरोधात निदर्शने देण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या या आंदोलनाला मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. त्यांनी अंगणवाडी सेविकांना लवकरच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या दरबारात अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मांडणार असल्याचा शब्द त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला. तसेच मनसेच्या वतीने सर्वांचा पाच लाखांचा विमा काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अंगणवाडी सेविकांना तुटपुंज्या मानधनावर राबवून घेतलं जात असल्याने त्यांनी आज शासनाविरोधात जेलभरो आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाविरुद्ध तीव्र निदर्शने दिली. शहरातून भव्य मोर्चा काढून त्यांनी शासनाच्या या अन्यायकारक धोरणाचा निषेध केला. अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांना घेऊन सतत आंदोलन करीत आहे. त्यांना केवळ आश्वासने देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. शासनाने अंगणवाडी सेविकांची मनधरणी करण्याकरिता त्यांच्या मानधनात नाममात्र वाढ केली. परंतु महागाईच्या या काळात त्यांना मिळणाऱ्या मानधनात त्यांचं जीवन जगणं कठीण झालं आहे. अंगणवाडी सेविकांनी नेहमी प्रामाणिक कर्तव्य बजावलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने त्या कार्य करत आहेत. कोरोना काळातही त्यांनी कोविड योद्धे म्हणून कामगिरी बजावली. असे असतांनाही राज्य शासनाने नेहमी त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा शासनाकडून देण्यात आल्या नाही. २०१७ पासून अंगणवाडी सेविकांचे प्रोत्साहन भत्ते रखडलेले आहेत. लाभार्थ्यांच्या पोषण आहार दरात महागाईच्या तुलनेत वाढ करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीही शासनाने अंमलबजावणी केली नाही. न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी हे पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी ऍक्ट नुसार ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला होता. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना २६ हजार तर मदतनिसांना २२ हजार रुपये मानधन मिळणे आवश्यक असतांना शासनाने मानधनात वाढ केली नाही. आधी योजनेसाठीचे छापीव रजिस्टर व अहवाल फार्म शासनाकडून मिळायचे, आता ते स्वखर्चाने घेण्याची शासनाने सक्ती केली आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे अंगणवाडी सेविकांनी आज जेलभरो आंदोलन केले. 

अंगणवाडी सेविकांच्या या आंदोलनाला मनसे नेते राजू उंबरकर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. तुम्हाला न्याय मिळवून देण्याकरिता तुमचा भाऊ सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तुमच्या मागण्या लवकरच शासन दरबारी ठेऊन तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही राजू उंबरकर यांनी अंगणवाडी सेविकांना आश्वस्त केले. मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारातुन अनेकांना न्याय मिळाला आहे. तुमच्याही मागण्यांना नक्कीच न्याय मिळेल असा शब्द त्यांनी यावेळी आंदोलन कर्त्या महिलांना दिला. त्यांनी आंदोलनाला दिलेला पाठिंबा व आश्वासनामुळे महिलांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार नारे दिले. अंगणवाडी सेविकांच्या भव्य मोर्चा व निदर्शनांनी आज शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी