शहरात लवकरच रंगणार टी-१० चॅम्पियन लिगचा थरार, २९ डिसेंबरला उद्घाटन सोहळ्यात गौतमी पाटील येणार

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणीच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी व लाखोंची अवाढव्य बक्षिस असणारी क्रिकेट स्पर्धा शहरात आयोजित करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला वणी वणीकरांना क्रिकेटचा थरार पहायला मिळणार आहे. २ जानेवारी पासून टी-१० चॅम्पियन लिग २०२४ (सिजन दुसरे) या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. पारसमल प्रेमराज ज्वेलर्स यांच्या विद्यमाने ही वणीच्या क्रिकेट जगतातील भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शासकीय मैदानावर (पाण्याची टांकी) या स्पर्धेचे सामने होणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. २९ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता टी-१० चॅम्पियन लिग स्पर्धेचा होणारा उद्घाटन सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यांगना व तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील हा सोहळा गाजवणार आहे. गौतमी पाटील यांचा खास सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. 

तालुक्यातील खेळाडूंमध्येही उत्तम खेळाडू होण्याची प्रतिभा दडलेली आहे. तालुक्यातूनही प्रतिभाशाली खेळाडू समोर यावे, व त्यांचं राज्यात नावलौकिक व्हावं या करिता राष्ट्रीय क्रिकेटच्या धर्तीवर ही भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येथिल खेळाडू देखील राष्ट्रीय क्रिकेट संघात सहभागी व्हावा, या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. ही स्पर्धा म्हणजे खेळाडूंसाठी आपली चमक दाखविण्याचं उत्तम व्यासपीठ आहे. या क्रिकेट लिग स्पर्धेत १० फ्रेंचायजींनी आपले बलाढ्य संघ उतरविले आहे. या स्पर्धेत टेनिस बॉलचे दिवसरात्र सामने रंगणार आहेत. टी-१० चॅम्पियन लिग स्पर्धेच्या विजेत्या संघांसाठी विक्रमतोड बक्षिसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतील पाहिलं बक्षीस ११ लाख १००१, दुसरं बक्षिस ५ लाख १००१, तिसरं बक्षिस २ लाख ५१००१, तर चौथं बक्षिस १ लाख १००१ एवढं ठेवण्यात आलं आहे. तसेच मन ऑफ दी सिरीज साठी एक महागडी मोटारसायकल पुरस्कार रूपात देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर आकर्षक बक्षिसांचीही या स्पर्धेत लयलूट होणार आहे. 

प्रेक्षकांसाठी बसण्याचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. महिला, पुरुष व मुख्य अतिथींसाठी बैठकीची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघात दिसणार आहेत. या स्पर्धेकरिता अनुभवी व जाणकार पंच (अंपायर) आमंत्रित करण्यात आले आहे. दोन एलईडी स्क्रीन मैदानात लावण्यात आल्या आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे द्वारे सामन्यांचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने युट्युबवर लाईव्ह दाखविले जाणार आहेत. युडीआरस अंपायर डिसिजन रिव्यू साठी थर्ड अंपायरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भव्य विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या आतिष बाजीत ही टी-१० चॅम्पियन लिग स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची व शुभारंभाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेतील प्रत्येक क्रिकेट सामने राष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट सामन्यांचा अनुभव देणारे ठरणार आहे. क्रिकेटचा छंद, आवड व क्रिकेटचा आनंद लुटणाऱ्या सर्वांसाठीच ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील क्रिकेट सामने बघण्याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वच क्रिकेट प्रेमी जनता आमंत्रित असल्याचे टी-१० चॅम्पियन लिग वणीचे कार्यकारणी अध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी सांगितले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी