रॉकवेल मिनरल्स कंपनीने दूर केली गावातील रस्त्याची समस्या, गावकऱ्यांसाठी बांधून दिला ३ किमी पक्का रस्ता
प्रशांत चंदनखेडे वणी
भालर ग्रामपंचायत हद्दीत रॉकवेल मिनरल्स ही कंपनी उभारण्यात आली. या कंपनीत भालर गावासह वणी शहरातीलही अनेकांना रोजगार मिळाला. ही कंपनी भालर गावाच्या विकासात मैलाचा दगड ठरू लागली आहे. या कंपनीने विविध सामाजिक उपक्रम राबवितांनाच भालर या गावाच्या विकासाला हातभार लावला आहे. गावकऱ्यांसाठी सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गावातील विकासकामे करण्यावरही रॉकवेल मिनरल्स या कंपनीने भर दिला आहे. गावात सोईस्कर रस्ते नसल्याने गावकऱ्यांना जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण व्हायच्या. काटेरी बाभळींनी वेढलेल्या पांदण रस्त्याने गावकऱ्यांना जाणे येणे करावे लागायचे. गावातील रस्त्यांची समस्या दूर करण्याकरिता रॉकवेल मिनरल्स कंपनीने पुढाकार घेतला. गावकऱ्यांसाठी रस्त्याची असलेली गरज ओळखून व गावकऱ्यांच्या मागणी वरून रॉकवेल मिनरल्स कंपनीने रस्त्याचे बांधकाम हाती घेतले.
भवानी मंदिरापासून गावापर्यंत ३ किमी पक्का रस्ता कंपनीने स्वनिधीतून बांधून दिला. रस्त्याचे अतिशय मजबूत बांधकाम करतांनाच आवश्यक तेथे सिमेंटचे पाईप सुद्धा टाकण्यात आले. ३ किमी लांब व २२ मीटर रुंद असलेल्या या रस्त्याच्या बांधकामाला ३५ लाख रुपयांचा खर्च आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या रस्त्याचा हस्तांतरण सोहळा नुकताच भालर या गावात पार पडला. रॉकवेल कंपनी कडून भालर ग्रामपंचायतीला हा रस्ता हस्तांतरित करण्यात आला. सामाजिक उत्तरदायित्वातून रॉकवेल कंपनीने भालर गावाकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत. गावात घेण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमांनाही या कंपनीने वेळोवेळी संहयोग केला आहे. रॉकवेल मिनरल्स कंपनी कडून गावात पक्क्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Comments
Post a Comment