आर.सी.सी.पी.एल. कंपनी कडून आरोग्य सेविकांसाठी तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी उपविभातील मुकुटबन येथील आर.सी.सी.पी.एल. सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडून आसपासच्या गावांमध्ये विविध सोइ सुविधा पुरविण्याबरोबरच गावातील समस्यांचे निराकरण करण्याचा सर्वोतपरी प्रयत्न केला जात आहे. तसेच कार्यक्षेत्रातील गावांमध्ये जनहितकारी कार्य करून गावकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबविले जात आहे. ग्रामवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक महत्वकांक्षी उपक्रम या कंपनीकडून राबविण्यात येत आहे. आर.सी.सी.पी.एल. कंपनीच्या सामाजिक दायित्व विभागांतर्गत कंपनीचे युनिट हेड जयंत कंडपाल यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील आरोग्य सेविकांसाठी कुरखेडा जि. गडचिरोली येथे तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यातून त्यांना ग्रामिण भागातील आरोग्य विषयक समस्या व त्यावरील उपचार पद्धती या विषयी विस्तृत माहिती देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविण्यात आले. 

ग्रामिण भागातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेता त्याचे निराकरण करण्याकरिता आरोग्य सेविकांना योग्य उपचार पद्धतीची माहिती मिळावी, या उद्देशाने कंपनी कडून अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. कुठल्या आजाराचा रुग्ण कसा हाताळायचा व त्या रुग्णावर कशा पद्धतीने उपचार करायचे याचे प्रशिक्षण यावेळी आरोग्य सेविकांना देण्यात आले. त्याचबरोबर त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा आरोग्य सेविकांना करून दाखविण्यात आले. ग्रामिण भागात भेडसावणाऱ्या विविध आरोग्य विषयक समस्या तसेच स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली, कुपोषित बालके यांच्या आरोग्याच्या समस्या समजून घेत त्यावर आपल्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या उपयोजना करता येईल, याचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यास दौऱ्यातून आरोग्य सेविकांना घेता आला. या अभ्यास दौऱ्यात कंपनीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडेगाव, मुकुटबन, पिप्रट, पिप्रडवाडी, येळशी, हिरापूर, बैलंपूर, रुईकोट, परसोडा येथील आरोग्य सेविकांनी सहभाग घेतला होता. त्यांना आमच्या आरोग्यासाठी या संस्थेद्वारे भारती सोनार्गे, रजनी डोंगरवार, गणेश, अमीर तुरले, गणेश हुलके यांनी ग्रामीण भागातील आजारांवरील उपचार पद्धती या विषयी सखोल ज्ञान दिले.  

या अभ्यास दौऱ्याला आर.सी.सी.पी.एल. कंपनीचे विभाग प्रमुख जयंत कंडपाल, तेजप्रताप त्रिपाठी, विजय कांबळे, यांनी उपस्थिती दर्शविली होती. या अभ्यास दौऱ्यामुळे आरोग्य सेविकांना आरोग्य विषयक कार्य करण्यास नियोजन बद्ध आराखडा मिळेल, असे मत यावेळी जयंत कंडपाल यांनी व्यक्त केले.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी