वणी शहरात उद्या भव्य धम्म क्रांती मेळावा, डॉ. राजरत्न आंबेडकर यांची लाभणार उपस्थिती
प्रशांत चंदनखेडे वणी
संविधान जागर सन्मान मंच वणी द्वारा भव्य धम्मक्रांती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २४ डिसेंबरला स्थानिक एस.पी.एम हायस्कुलच्या भव्य पटांगणात आयोजित या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांची उपस्थिती लाभणार आहे. बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता आपलं आयुष्य वेचणाऱ्या डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी बौद्ध तत्वज्ञानापासून भरकटत चाललेल्या समाजाला बुद्धांच्या वाटेवर आणण्याचा एकाकी प्रयत्न चालविला आहे. देशात बुद्धांची विचारसरणी पेरण्याचा त्यांनी वसा घेतला आहे. या मेळाव्यातून ते बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करणे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. बुद्धाचं तत्वज्ञान देशात रुजविण्याकरिता त्यांनी चळवळ उभारली आहे. बुद्ध धम्माचं तत्वज्ञान अवगत करण्याची प्रेरणा देणारे त्यांचे तत्वनिष्ठ विचार ऐकण्याची संधी संविधान जागर सन्मान मंचाने उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमाला जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.
२४ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता या धम्म क्रांती मेळाव्याची सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विलास वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर लगेच विश्वविख्यात बौद्ध मार्गदर्शक डॉ. राजरत्न आंबेडकर हे बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. राजरत्न आंबेडकर यांचं मार्गदर्शन ऐकण्याचा हा योग संविधान जागर मंचाने जुळवून आणला आहे. डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे विचार ऐकण्याकरिता बुद्धिवादी लोक कित्येक मैल प्रवास करून त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवितात. त्यांच्या ज्ञानवर्धक विचारांनी आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून त्यांच्या कार्यक्रमांना ज्ञान आत्मसात करणाऱ्यांची गर्दी उसळलेली पहायला मिळते. वणी शहरात त्यांचा भव्य मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात डॉ. राजरत्न आंबेडकर यांचं बौद्ध तत्वज्ञानावर मौलिक मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे या धम्म क्रांती मेळाव्याला हजारोंच्या संख्येने जनतेने उपस्थित राहण्याचे आव्हान संविधान जागर सन्मान मंचाचे उपाध्यक्ष प्रशांत गाडगे तथा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment