Latest News

Latest News
Loading...

मोहर्ली शिवारातील नाल्यात आढळला युवकाचा मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील मोहर्ली शिवारातील पांदणरस्त्यालगत असलेल्या नाल्यात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोहर्ली या गावातच वास्तव्यास असलेल्या मारोती जगन्नाथ तोडासे (३८) या युवकाचा काल ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नाल्यात मृतदेह आढळून आला. मृतक हा ३ डिसेंबर पासून घरून बेपत्ता होता. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. काल मोहर्ली शिवारातील नाल्यात त्याचा मृतदेहच आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. 

मृतक हा दारूचा व्यसनी असल्याचे समजते. तो आपल्या आई सोबत मोहर्ली येथे रहात होता. पत्नी त्याच्या पासून विभक्त असल्याचे कळते. ३ डिसेंबरला तो घरून बेपत्ता झाला. त्याच्या बेपत्ता होण्याची कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला तक्रार देखील नोंदविली होती. काल ५ डिसेंबरला मोहर्ली शिवारातील पांदण रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना नाल्यात त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. नाल्यात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मारोती तोडासे या युवकाच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस त्याच्या मृत्यूमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.