रुखमाई कोल वॉशरी येथे घेण्यात आलं भव्य आरोग्य तपासणी शिबीर
प्रशांत चंदनखेडे वणी
आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे. जीवनातील व्यस्ततेमुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्यातील छोटे आजार गंभीर रूप धारण करतांना दिसतात. कोळसा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही अनेक आजार उद्भवतात. पण ते देखील कामातील व्यस्थतेमुळे आपल्या आरोग्याची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. कुणी आर्थिक टंचाईमुळे तर कुणी कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याची तपासणी करणे टाळत असल्याने त्यांच्यात गंभीर आजार बळावू लागले आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनाही आरोग्य तपासणी करणे शक्य व्हावे म्हणून सेवाभावी उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली जात आहे. रुखमाई कोल वॉशरी व्यस्थापनानेही सामाजिक जाणिवेतून भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून कंपनीतील कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण केले. वाय.आर.जी. केयर सेंटरचे डॉ. पवन दरवे, काऊन्सलर गोविंद कुंभारे, प्रणाली सोनटक्के व टीमने या शिबिरात आरोग्य तपासणी करण्याचं कार्य पार पाडलं. जवळपास १५० च्या वर कर्मचारी, कामगार व परिसरातील रहिवाशांनी या आरोग्य शिबीरातुन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिराला कंपनीतील संपूर्ण ऑफिस स्टाफ, कर्मचारी व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. शिबिराच्या यशस्वीतेकरिता रुखमाई कोल वॉशरीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment