विवंचनेतून शेतकऱ्याने घेतला गळफास, सतत होणाऱ्या आत्महत्यांनी वाढविली चिंता


प्रशांत चंदनखेडे वणी 

मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमलोन या गावातील एका कास्तकाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १९ डिसेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आनंदराव शंकर मेश्राम (५०) असे या गळफास घेतलेल्या कास्तकाराचे नाव आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

झरी जामणी तालुक्यातील आमलोन या गावात परिवारासह वास्तव्यास असलेल्या आनंदराव मेश्राम या कास्तकाराने घराच्या आड्याला आयलोन दोराने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबातील सदस्य वणी येथे मुक्कामी असतांना त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने राहत्या घरीच गळफास घेत मृत्यूला कवटाळले. सकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याची माहिती मुकुटबन पोलिसांना देण्यात आली. मुकुटबन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कास्तकाराने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. मृतक आनंदराव मेश्राम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या आत्महत्या करण्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. त्यांच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी