प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मनिष नगर येथिल आंबेडकरी चळवळीतील युवकांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता पासून हे रक्तदान शिबीर सुरु होणार आहे.
वणी तालुक्यात अपघातांचे प्रमाण बरेच वाढले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. तसेच प्रसूती दरम्यानही महिलांना रक्ताची गरज भासते. सिकलसेल हा आजार जडलेल्या रुग्णांना तथा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागत असल्याने रक्त पेढीतील रक्तसाठा कमी होऊन रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जातं. याच दृष्टिकुनातून आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपलं रक्त कुणाचा तरी जीव वाचवू शकतं, या जाणिवेतून रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करण्याचे आव्हान बाबासाहेबांचे अनुयायी असलेल्या युवकांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी ९ वाजता पासून या रक्तदान शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आव्हान शिबिराचं आयोजन करणाऱ्या युवकांनी व संस्कार तेलतुंबडे यांनी केले आहे.

No comments: