प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
सर्वसामान्य, कष्टकरी व कास्तकारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रखतेने आवाज उठविणाऱ्या विश्वसभाऊंनी कास्तकारांच्या समस्या व प्रश्नांना घेऊन रान उठवले आहे. कास्तकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध दंड थोपटले आहे. १८ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन त्यांच्या नेतृत्वात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेत मालाला योग्य भाव, हमी दरापेक्षा तिप्पट किमतीने शेतमालाची खरेदी, वन्य प्राण्यांमुळे शेत पिकांचे होणारे नुकसान, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, आदी मागण्यांना घेऊन विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून (उबाठा) भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी व समस्याग्रस्त जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता आवज उठविणाऱ्या विश्वासभाऊ यांचा आज वाढदिवस, एका कर्मठ व निष्ठावान शिव सैनिकाकडून त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
शुभेच्छुक :- धर्मेंद्र काकडे, निष्ठावान शिवसैनिक तथा शिवसेनेशी (उबाठा) एकनिष्ठ असलेले तडफदार कार्यकर्ते


No comments: