Latest News

Latest News
Loading...

माहेरी रहात असलेल्या महिलेची गळफास घेऊन आत्महत्या


प्रशांत चंदनखेडे वणी 

माहेरी रहात असलेल्या एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ९ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील शास्त्री नगर येथे या महिलेचे माहेर असून ती मागील काही महिन्यांपासून माहेरी आपल्या आईकडे रहात होती. आज तिने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. जयश्री राजू कुळसंगे (२०) असे या गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. 

जयश्री ही मागील काही महिन्यांपासून माहेरी आपल्या आईकडे रहात होती. तिचे लग्न वरोरा तालुक्यातील खरवड येथील युवकाशी २ वर्षांपूर्वी झाले होते. सासरी काही विवाद झाल्याने ती माहेरी राहायला आली होती. माहेरी ती रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायची. आज आई घरी स्वयंपाक करीत असतांना ती शौचास जातो म्हणून घराबाहेर पडली, आणि जंगल शिवारातील एका झाडाला गळफास लावून जगाचा निरोप घेतला. तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे आलेल्या नैराश्येतून तिने मृत्यूला कवटाळल्याचे बोलल्या जात आहे. तिच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ती गळफास घेत असतांना काही मुलांनी आरडाओरड केली. मुलांची आरडाओरड ऐकून काही इसम त्या दिशेने धावले. पण तोपर्यंत खूप वेळ झाली होती. तिने तोवर गळफास घेतला होता. कुणी वाचवायला येण्याआधीच ती गतप्राण झाली. तिने गळफास घेतल्याची माहिती आधी कुटुंबियांना व नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.