शहरातील पंचशील नगर परिसरातील दोन दुकानांना भीषण आग
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील पंचशील नगर परिसरात असलेल्या नसिम टेक्सटाइल व सहारा बोअरवेल्स या दुकानांना काल मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत दुकानातील वस्तू व साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आगल्याचे सांगण्यात येत आहे. ही दोन्ही दुकाने एकमेकांना लागून आहेत. दुकानांना लागलेल्या या आगीमुळे दुकान मालकांचे प्रचंड नुकसान झाले असून नेमके किती नुकसान झाले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या दुकानांच्या सभोताल नागरिकांची निवसस्थानेही असून दाट लोकवस्ती असलेला हा परिसर आहे. अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला.
काल 12 जानेवारीला रात्री 12 वाताच्या सुमारास पंचशील नगर परिसरातील नसीम टेक्सटाइल व सहारा बोअरवेल्स या दोन दुकांना अचानक आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण करीत दोन्ही दुकानांना आपल्या कवेत घेतले. दुकानातील सर्व वस्तू व साहित्य आगीच्या भक्षस्थानी चढले. नसीम टेक्सटाइल मधील कपडे पूर्णतः जळून खाक झाले असून सहारा बोअरवेल्स या दुकानालाही आगीच्या झळा पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. सहारा बोअरवेल्स या दुकानातील महागड्या वस्तू व साहित्यही आगीच्या भक्षस्थानी चढल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानांना आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दुकान मालकाला याची माहिती दिली. तसेच त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणली. दुकानांना लागलेल्या या आगीमुळे दुकान मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु नेमके किती नुकसान झाले हे मात्र अद्याप कळू शकले नाही.
Comments
Post a Comment