नैराश्येतून आणखी एका युवकाने घेतला गळफास, सततच्या आत्महत्यांनी निर्माण केली चिंता

प्रशांत चंदनखेडे वणी 

निराशावादी मानसिकतेतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नैराशेतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्या जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिवनातील संकटांचा सामना न करता मृत्यूला कवटाळले जात असून वैफल्य भावनेतून आत्महत्या होतांना दिसत आहेत. जिवनाविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन आत्महातेला कारणीभूत ठरू लागला आहे. सतत होणाऱ्या आत्महत्यांमुळे वणी उपविभाग हादरला आहे. आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून समुपदेशन व उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विवंचनेतून आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज १० जानेवारीला मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या युवकाकडे चार एकर शेतजमीन असल्याचे समजते. घरी कुणी नसतांना त्याने राहत्या घरीच नायलॉन दोराने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. तात्याजी नारायण बोथले (४२) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

म्हैसदोडका येथे परिवारासह राहत असलेल्या या युवकाने राहत्या घरीच नायलॉन दोराने गळफास लावून आपल्या जीवनाचा शेवट केला. घरी कुणी नसतांना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. घरातील मंडळी सायंकाळी शेतातून परतल्यानंतर त्यांना तात्याजी हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नायलॉन दोराने लटकलेला त्याचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबाचा आधार असलेल्या युवकाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबं पुरतं हादरलं आहे. घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्येचा पर्याय निवडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पण विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. आव्हाने पेलताना आलेल्या नैराश्येतून टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. सतत होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता निर्माण केली आहे. आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक तात्याजी बोथले यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहे. पुढील तपास मारेगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी