२० जानेवारीला पाथरी (गो.) येथे भव्य पदावली भजन स्पर्धा

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील पाथरी (गो.) येथे शिवशक्ती पदावली भजन मंडळाच्या वतीने भव्य पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथिल हनुमान मंदिर परिसरात २० जानेवारीला ही भजन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रविंद्र बदद्खल, उपसरपंच संध्या बोरडे, ग्रामसचिव एल.डी. पवार, पोलिस पाटील रविंद्र बोरडे, माजी सरपंच तथा ग्रा. स. राजेंद्र ईद्दे, ग्रा.स. संजय कुमरे, कलावती बोरडे, काशिनाथ घुगरुड, बाळकृष्ण बोरडे, दादाजी अकीनकार, भिवाजी कुमरे, नानाजी कुमरे आदी उपस्थित राहणार आहेत. या पदावली भजन स्पर्धेकरिता आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. या भजन स्पर्धेत नावाजलेल्या भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे. पारंपरिक वाद्यातून भक्तीचा सूर छेडणारी ही भजन स्पर्धा भक्तिमय वातावरणात रंगणार आहे. 

या भजन स्पर्धेत बक्षिसांची मोठी लयलूट होणार आहे. या स्पर्धेतील पहिलं बक्षिस १५०२१ रुपये, दुसरं बक्षिस १३०२१ रुपये, तिसरं बक्षिस ११०२१ रुपये, चौथं बक्षिस ९०२१ रुपये, पाचवं बक्षिस ७०२१ रुपये, सहावं बक्षिस ५०२१ रुपये तर सातवे बक्षिस ३०२१ रुपये राहणार आहे. तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता १०२१ रुपये प्रवेश शुल्क तर तक्रार शुल्क ४०२१ रुपये ठेवण्यात आले आहे. अनेक नामवंत भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून भजन मंडळं उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी होत आहेत. पारंपरिक भजनातून भक्तिमय वातावरण निर्माण करण्याकरिता या पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील भजनांनी रसिक प्रेक्षक भक्ती सागरात बुडाल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा या भजन स्पर्धेतून भक्तीचा आनंद घेण्याकरिता जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवशक्ती पदावली भजन मंडळाचे अध्यक्ष रंजित उकिनकर, उपाध्यक्ष राजू बोरडे, सचिव गजानन उकिनकर, कोषाध्यक्ष अमरदीप सुरतीकर, प्रफुल बोरडे तथा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.  


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी