प्रशांत चंदनखेडे वणी
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वणी नगर वाचनालय येथे हेमंत व्यख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज १९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता नगर वाचनालयाच्या प्रांगणात ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी यवतमाळ येथिल सुप्रसिद्ध वक्ते तथा संस्कृत भारतीचे जिल्हा संयोजक मोरेश्वर गजानन पुंडशास्त्री यांना आमंत्रित करण्यात आलं असून त्यांचं "त्यागमूर्ती भगवान श्रीराम" या विषयवार आधारित व्याख्यान वणीकरांना ऐकायला मिळणार आहे. विदर्भ साहित्य संघ वणी शाखेच्या वतीने प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृत्यर्थ ही व्यख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, श्रीराम शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष रविंद्र बेलुरकर यांची उपस्थिती लाभणार आहे. वणीकर जनतेने या सुश्राव्य व्याख्यानाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन वणी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार, सचिव गजानन कासावार तथा सर्व संचालकांनी केले आहे.
Comments
Post a Comment