सामाजिक बांधिलकी जपून साजरा केला संजय देरकर यांनी आपला वाढदिवस


प्रशांत चंदनखेडे वणी 

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते संजय देरकर यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी सामाजिक बांधिलकी जपून साजरा करण्यात आला. कुठल्याही प्रकारची धामधूम व जल्लोष न करता अतिशय साधेपणाने त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. सामाजिक जाणीव ठेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आदर सत्कार केला. सेवाभावी कार्य करणाऱ्या महिला पुरुषांचाही त्यांनी यावेळी सन्मान केला. राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिनिधींचा तथा लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या वृत्तसंकलकांचाही त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कार केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. 

आपला वाढदिवस हा त्यांनी जनसेवेसाठी झटणाऱ्या सर्वांसाठीच समर्पित केला. आरोग्य सेवेचा ध्यास घेतलेल्या आशा सेविकांचा त्यांनी आपल्या वाढदिवशी सत्कार केला. तसेच पळसोनी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तथा सदस्यांचाही त्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. त्याचप्रमाणे सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या व्यक्तींचाही संजय देरकर यांनी यावेळी सत्कार केला. त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे तर विधवा महिलांना साळी चोळीचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपून संजय देरकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय देरकर यांनी आपला वाढदिवसही अतिशय साधेपणाने साजरा केला. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी