भरधाव ट्रक व कारची समोरासमोर धडक, एक ठार तर सहा जण गंभीर जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

भरधाव ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार तर कार मधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज २४ जानेवारीला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ घडली. मारेगाव वरून चंद्रपूरकडे जात असलेल्या अर्टिगा कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकची जबर धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, अपघातग्रस्त कार पार चक्काचूर झाली. या अपघातात कारचा चालक मालक असलेला शेख नवाज शेख मुजफ्फर (२७) रा. मारेगाव हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात हलविण्यात आले असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला. 

मारेगाव येथील कुटुंब आपल्या अर्टिगा कारने (MH १३ DE ७९०६) चंद्रपूर येथे जात होते. त्यांनी कार चालविण्याकरिता रोजंदारीने एका चालकालाही सोबत घेतले होते. मात्र कार चालकाला बाजूच्या सीटवर बसवून कार मालक हा स्वतःच कार चालवित होता. दरम्यान मारेगाव वरून चंद्रपूरकडे जात असतांना निंबाळा फाट्याजवळ कार व मालवाहू ट्रकची (MH ३४ BG १३३७) समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारचा चालक मालक असलेला शेख नवाज शेख मुजफ्फर याचा करून अंत झाला तर कार मधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या सहाही जणांना पुढील उपचाराकरिता चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. 

पाळीव जनावर आडवं आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हा भीषण अपघात झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने रोडच्या खाली फेकल्या गेली. भरधाव ट्रकने कारला काही अंतरापर्यंत अक्षरशः फरफटत नेले. या अपघातात कारचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. दोन्ही वाहनांची धडक होताच आसपासचे नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र शेख नवाज शेख मुजफ्फर याचा वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात कार मधील झेबा शेख बरकत (२५), हजरा शेख मुजफ्फर (६०), हसनेन शेख बरकत (४), अहमान शेख बरकत (दीड वर्ष), कमर सय्यद (३८) सर्व रा. मारेगाव व आलिया शेख (१५) रा. मार्डी हे सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करीत अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक व अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला लावली. पुढील तपास पोलिस करीत आहे. 




Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी