शिवसेना (उबाठा) नेते संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 


प्रशांत चंदनखेडे वणी 

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, शिवसेना (उबाठा ) नेते तथा वणी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष संजयभाऊ देरकर यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा ! संजयभाऊ देरकर यांनी आपला वाढदिवस नेहमीच सेवाभावी दृष्टिकोन ठेऊन अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला आहे. समाजशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. राजकारणाबरोबरच समाजकार्यातही त्यांनी तेवढीच तत्परता दाखविली आहे. लोकहिताचे कार्य करण्यावर त्यांनी नेहमी भर दिला आहे. संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची वणी विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. संयमी राजकारणी म्हणूनही ते ओळखले जातात. कसलाही उदोउदो न करता त्यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्याला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे. गोरगरीब जनतेला वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे.

कास्तकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला आहे. बेरोजगारांसाठी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनं उभारली आहेत. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. येथील युवकांना रोजगार मिळावा, याकरिता त्यांनी या क्षेत्रातील कंपनी व्यवस्थापकांवर दबाव आणला. वेकोलिच्या अधिनस्त असलेल्या कंपन्यांमध्ये तथा इतरही खाजगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या नोकरदार वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपलं वेगळंपण टिकवून ठेवलं. त्यांचं राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य दिवसेंदिवस बहरत गेलं आणि त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली. त्यांचं सर्वसमावेशक कार्य बघता मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दर्शविला, व त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदाची जबादारी सोपविली. आजही ते आपलं कार्य तेवढ्याच पोटतिडकीने करीत आहेत. त्यांचा संयमी स्वभावगुण त्यांचं वैशिट्य ठरला असून याच स्वभावगुणामुळे त्यांचं जनतेशी एक अतूट नातं जुळलं आहे. राजकीय व सामाजिक कार्याचा मेळ साधून जनकार्याला प्राधान्य देणाऱ्या या मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. 

सृजनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजयभाऊ देरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

या शुभेच्छा दिल्या आहेत, राजेंद्र ईद्दे यांनी. राजेंद्र ईद्दे हे  गोवारी (पारडी) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून विद्यमान सदस्य आहेत. ते सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असतात. संजयभाऊ देरकर यांच्याशी एकनिष्ठ असलेले राजेंद्र ईद्दे हे त्यांचे विश्वासू व खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. राजेंद्र ईद्दे यांनी आपला कर्तव्यनिष्ठपणा जपला आहे. संजयभाऊ देरकर यांच्या कार्यात त्यांनी नेहमी आपला सहभाग दर्शविला आहे. राजेंद्र ईद्दे हे संजयभाऊ देरकर यांच्या खास कार्यक्रत्यांमधून एक मानले जातात. त्यांनी संजयभाऊ देरकर यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही." तिच वाट जाते क्षितिजाकडे, मोहात गगनाच्या मी वाट बदलणार नाही," हा ध्येय व संकल्प करणाऱ्या राजेंद्र ईद्दे यांनी संजयभाऊ देरकर यांच्याशी निष्ठा राखली आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी