विशिष्ट कारणावरून आईने रागवले आणि मुलीने घेतला गळफास

प्रशांत चंदनखेडे वणी 

एका विशिष्ट कारणावरून आईने मुलीला रागविल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलीने टोकाचा निर्णय घेत शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल २० जानेवारीला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अलपवयीन मुलीला जडलेल्या विशिष्ट सवयीमुळे आईने मुलीला रागविले. हा राग मनात धरून अल्पवयीन मुलीने शेत शिवारातील झाडाला गळफास लावून आपल्या जीवनाचा शेवट केला. शुल्लक कारणावरून आई व मुलीत झालेल्या वादातून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जोत्सना आत्राम (१४) रा. रासा ता. वणी असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या तरुण व तरुणीने एकाच दिवशी आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने तालुका हादरला आहे.  

रासा या गावात परिवारासह रहात असलेली ही अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. शालेय शिक्षण घेत असतांना तिला विशिष्ट सवय जडल्याने आईने तिला रागविले. या कारणावरून नंतर आई व मुलीत चांगलाच वाद झाला. आईने रागविल्याचा राग मनात धरून तिने शेत शिवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृतक मुलीचं कुटुंबं हे मूळचं मारेगाव तालुक्यातील सुसरी पेंढरी येथील असून तिचे वडील अय्या आत्राम हे रासा येथील महेंद्र राखुंडे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. शेतातीलच निवाऱ्यात ते आपल्या पत्नीसह राहतात. जोत्सना ही सुसरी पेंढरी येथेच आपल्या आजी-आजोबांसोबत राहायची. तेथीलच शाळेत ती आठव्या वर्गात शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी ती आपल्या आई वडिलांकडे रासा येथे आली होती. याच काळात आई व मुलीत एका विशिष्ट कारणावरून वाद झाला. आणि या वादाचे पर्यवसान मुलीच्या आत्महत्येत झाले. 

२० जानेवारीला आईने रागविल्यानंतर जोत्सना ही शौचास जाण्याचे बहाण्याने तडक घराबाहेर पडली, ती घरी परतलीच नाही. खूप वेळ होऊनही ती घरी न परल्याने तिच्या आईने तिचा शोधाशोध सुरु केला. तिचा शोध घेत असतांनाच ती शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने आईला चांगलाच धक्का बसला. तिचा झाडाला दोरीने लटकलेला मृतदेह पाहून आईने एकच हंबरडा फोडला. तिची आरडाओरड ऐकून मुलीचे वडील घटनास्थळी धावून आले. समोरील दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यातूनही अश्रूचा बांध फुटला. नंतर ही माहिती पोलिस पाटलांना देण्यात आली. पोलिस पाटलांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी