लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धडकले जिल्हा बदलीचे आदेश, ठाणेदार अजित जाधव यांची जिल्हा बदली

प्रशांत चंदनखेडे वणी 

काही महिन्यांवरच येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणूका बघता पोलिस खात्यात जिल्हा बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. जिल्हयात ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर खांदेपालट करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार वणी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अजित जाधव यांच्या बदलीचे आदेश आले आहेत. त्यांची अकोला जिल्ह्यात बदली झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ठाणेदार अजित जाधव हे सहा ते सात महिन्यांपूर्वी प्रशासकीय बदल्यांच्या काळात वणी पोलिस स्टेशनमध्ये रुजू झाले होते. तत्पूर्वी ते मुकुटबन पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्यरत होते. त्यांच्या बरोबरच वणी उपविभागातील पीएसआय दर्जाच्या आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही आदेश आल्याचे सांगण्यात येत आहे. 

वणी, शिरपूर व मुकुटबन ही पोलिस स्टेशन नेहमीच आव्हानात्मक राहिलेली आहे. जबाबदारीचे पोलिस स्टेशन म्हणून या तीनही पोलिस स्टेशनकडे पाहिले जाते. खनिज संपत्तीने नटलेला व आर्थिकदृष्टया संपन्न असलेला हा वणी उपविभाग असून प्रत्येक राज्यातील लोकं याठिकाणी व्यावसाय व नोकरी कामानिमित्त स्थायिक झाली आहेत. परप्रांतीयांचा मोठा भरणा याठिकाणी दिसून येतो. खनिज तस्करांनीही वणी उपविभागात ठिय्या मांडला असून खनिजांची मोठी तस्करी याठिकाणी होतांना दिसते. ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याने या तीनही पोलिस स्टेशनमध्ये रुबाबदार व कर्तव्यदक्ष ठाणेदार असणे गरजेचे आहे. 

वणी तालुक्यात अपराधीक घडामोडी नेहमीच घडतांना दिसतात. अपप्रवृत्तीच्या लोकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याने येथील गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्याकरिता वणी पोलिस स्टेशनमध्ये रुबाबदार ठाणेदाराची वर्णी लागणं गरजेचं असल्याचा मतप्रवाह दिसून येत आहे. ठाणेदार अजित जाधव यांनी वणी पोलिस स्टेशनची धुरा सांभाळल्यानंतर आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्हेगारी क्षेत्र त्यांनी नियंत्रित ठेवलं. अनेक गंभीर गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला. गुन्हेगारी प्रवृत्तीला त्यांच्या कार्यकाळात बऱ्यापैकी आळा बसला होता. जिल्हा बदलीमुळे त्यांना वणी पोलिस स्टेशनचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांची बदली झाल्याचे कळताच शहरवासीयांना आश्चर्याचा धक्का बसला. आता त्यांच्या नंतर वणी पोलिस स्टेशनला कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस स्टेशनसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते. त्यामुळे या पोलिस स्टेशनची सोडत कुणाच्या नावाने निघते, याची सर्वांनाच उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी