शहरातील रविनगर येथे धाडसी घरफोडी, चोरट्यांनी सोने,चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांवर केला हात साफ

 
प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरातील रविनगर येथील बंद घराला टार्गेट करून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना २ जानेवारीला उघडकीस आली. पोलिसांच्या रूट मार्च व गस्ती नंतरही शहरात घरफोडीच्या घटना घडू लागल्याने शहरवासीयांच्या मालमत्तेची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कुटुंब देव दर्शनाला गेल्याने कुलूपबंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. घरातील कपाटात असलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. सोन्याचांदीचे दागिने व १५ हजार रोख असा एकूण १ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. दुचाकी चोरीच्या घटनांबरोबरच आता घडफोडीच्या घटनाही घडू लागल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दाट वस्तीत धाडसी घरफोडी करून चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणाचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

जितेशकुमार श्रीकृष्णमुरारी पांडे हे परिवारासह गुलाबराव मोरे यांच्या घरी किरायाने राहतात. ते मूळचे रोहतास, बिहार येथील रहिवाशी असून सध्यस्थितीत ते रविनगर येथे वास्तव्यास आहेत. २८ डिसेंबरला ते कुटुंबासह देव दर्शनाला गेल्याने त्यांच्या घराला कुलूप लागले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूपबंद घराला टार्गेट केले. चोरट्यांनी दाराचा कुलूपकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन बेडरूम मधिल चारही कपाट त्यांनी फोडले. त्यापैकी लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेऊन असलेले सोन्याचे मंगळसूत्र १० ग्राम, सोनसाखळी १५ ग्राम, हिरे जडित नेकलेस, सोन्याची नथ ३ ग्राम, कर्णफुले दोन जोड ९ व ५ ग्राम, सात तोळ्याचे चांदीचे दागिने व १५ हजार रोख असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. २ जानेवारीला जितेशकुमार पांडे हे कुटुंबासह घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजाचा कुलूपकोंडा तुटलेला दिसला. घरातील साहित्यही विखुरलेले दिसले. त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पहिले असता त्यांना बेडरूम मधील सामनाही अस्ताव्यस्त पडलेले दिसले. रूम मधील सर्वच कपाटांची दारे उघडी दिसली. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने, चांदी व हिऱ्याचे दागिने तथा रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. जितेशकुमार पांडे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी