पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत संजय खाडे यांचा दणदणीत विजय
प्रशांत चंदनखेडे वणी
श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे हे कापूस पणन महासंघाच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत वणी झोन मधून विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शेखर धोटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत संजय खाडे यांना ७ मते मिळाली. तर शेखर धोटे यांना केवळ ३ मतांवर समाधान मानावे लागले. ७ जानेवारीला पणन महासंघाची निवडणूक पार पडली. ९ जानेवारीला नागपूर येथे मतमोजणी झाल्यानंतर संजय खाडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी संचालक पदाच्या या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या विजयामुळे सहकार क्षेत्राला अनुभवी व कार्यशील व्यक्तिमत्व लाभलं आहे. पणन महासंघाच्या या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज दुपारी ४ वाजता टिळक चौक येथे त्यांच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रत्येकचं निवडणूक ही त्या क्षेत्रातील महत्वपूर्ण व प्रतिष्ठेची मानली जाते. संजय खाडे यांची राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील वाटचाल प्रशंसनीय आहे. त्यांचा नुकताच नाफेड मार्फत मोठ्या प्रमाणात चना खरेदी करून दिल्याबद्दल व्यापकोच्या वतीने सन्मान करण्यात आला होता. त्यांचं कार्य उत्तरोत्तर बहरत गेल्याने त्यांचं नाव पणन महासंघाच्या वणी झोनच्या निवडणुकीकरिता सुचविण्यात आले. पणन महासंघाच्या संचालक पदासाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत संजय खाडे यांनी दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत १० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ७ मते घेऊन संजय खाडे हे विजयी झाले. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाच्या निवडणुकीत कापूस फेडरेशनशी संलग्न असलेल्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निवडणूक लढवू व मतदान करू शकतात. संजय खाडे हे वसंत जिनिंगचे संचालक आहेत. त्यामुळे पणन महासंघाच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीकरिता त्यांचं नाव पाठविण्यात आलं होतं. आणि त्यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment