सततच्या आत्महत्यांनी वाढविली चिंता, आणखी एका तरुणाने घेतला गळफास

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून एका पाठोपाठ होत असलेल्या आत्महत्यांनी चिंता वाढविली आहे. नैराश्य व विवंचनेतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एक सरण विझत नाही तोच दुसरं सरण रचण्याचा प्रसंग ओढवला जात असल्याने तालुका हादरला आहे. कुटुंबाचा आधार असलेले तरुण आत्महत्या करू लागल्याने पालकवर्ग कमालीचा चिंतेत आला आहे. आज आणखी एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील मंदर या गावातील उमेश प्रकाश पेंदाने (२५) या तरुणाने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. आज १० फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास त्याने गळफास घेल्याचे सांगण्यात येत आहे. 

वणी तालुक्यातील मंदर या गावात कुटुंबासह राहत असलेल्या उमेशने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. उमेश हा नुकताच एका खाजगी कंपनीत कामाला लागला होता. तो कंपनीतील रात्रपाळीची ड्युटी आटपून घरी परतला, व नेहमी प्रमाणे आईला सांगून खोलीत झोपायला गेला. काही वेळानंतर कुटुंबीय त्या खोलीत गेले असता त्यांना उमेश हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. कुटुंबीयांची आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घरातील कर्त्या मुलाने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक उमेश याला मोठा भाऊ असून तो फोटो स्टुडिओ व ऑनलाईन सेंटर चालवितो. तर वडील ऑटो चालवून कुटुंबाचा गाडा हाकतात. उमेशने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. उमेश याच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी