Latest News

Latest News
Loading...

सहारा पार्क येथे भर दुपारी घरफोडी, चोरट्यांनी सोन्याची पोत व रोख रक्कम केली लंपास

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क येथे दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची घटना काल ८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घरातील सदस्य काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता चोरट्यांनी आपला डाव साधला. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास केला. दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडू लागल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबं काही कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर कुलूपबंद घराला दिवसाढवळ्या टार्गेट करून घरातील मुद्देमाल चोरून नेण्याइतपत चोरट्यांच्या हिंमती वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

सहारा पार्क येथे वास्तव्यास असलेल्या शंकर घुग्गुल (४०) यांच्या कुलूपबंद घराला भर दुपारी चोरट्यांनी टार्गेट केले. कुटुंबातील सदस्य काही कामानिमित्त घराबाहेर गेल्याने घराला कुलूप लागलं होतं. त्यामुळे घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेऊन असलेली सोन्याची ४ तोळ्याची पोत व रोख ५ हजार रुपये असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेने विरळ वस्ती असलेल्या या परिसरातील नागरिक चांगलेच काळजीत आले आहेत. दिवसाढवळ्या घरफोडी करण्याइतपत चोरट्यांची मजल वाढल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. भर दुपारी घडलेल्या या घरफोडीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे. शंकर घुग्गुल यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.