शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच, पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील गुरुनगर येथे किरायाने राहत असलेल्या व मारेगाव येथिल महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १६ फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. विवेक उमेश बोंडे (१९) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक तरुण हा मूळचा मेंढोली येथिल रहिवासी असून तो आपल्या बहिणी सोबत शहरातील गुरुनगर येथे खंदारे यांच्या घरी भाड्याने राहत होता. वणी येथे राहून तो मारेगावला शिक्षण घेत होता. दरम्यान बहीण गावाला गेल्याने तो घरी एकटाच होता. घरी कुणी नसतांना त्याने राहत्या घरीच ओढणीने गळफास लावून मृत्यूला कवटाळले. तरुणांच्या आत्महत्या करण्याने चिंता वाढली आहे. शहरात आत्महत्यांचं सत्रच सुरू असून तरुणवर्ग नैराश्येतून आत्मघाती निर्णय घेऊ लागल्याने पालकवर्गाच्या चिंता वाढल्या आहेत. 

मुळचा मेंढोली येथिल रहिवाशी असलेल्या व पदवीच्या अभ्यासक्रमाकरिता वणी येथे भाड्याने राहत असलेल्या विवेकने राहत्या घरीच गळफास घेतला. मारेगाव येथिल महाविद्यालयात तो बीएस्सी द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. शहरातील गुरूनगर येथिल खंदारे यांच्या घरी तो बहिणी सोबत भाड्याने राहत होता. बहीण गावाला गेल्याने घरी एकटाच असलेल्या विवेकने गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला. आज पहाटे तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने रात्रीच गळफास घेतला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विवेकने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबं मात्र पुरतं हादरलं आहे. शैक्षणिक भवितव्य घडविण्याच्या व कुटुंबाचा आधार बनण्याच्या वयात तरुण मृत्यूचा मार्ग निवडू लागल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिस त्याच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी