व्यावसायिक करीत आहे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर आणि अधिकारी हाकत आहे उंटावरून शेळ्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरासह संपूर्ण तालुक्यात छोट्या व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडर वापरण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकांना १९ किलो वजनाचे गॅस सिलिंडर वापरणे अनिवार्य असतांना व्यावसायिक सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर करतांना दिसत आहेत. व्यवसायात व्यावसायिक सिलिंडरचा वापर न करता घरगुती गॅस वापरला जात असल्याने घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण होतांना दिसत आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायात वापर वाढल्याने या सिलिंडरच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांमध्ये खुलेआम घरगुती सिलिंडर वापरला जात असतांना संबंधित विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे. हॉटेल, रेस्टोरंट, चायनीज गाड्या तसेच चौकाचौकात खाद्यपदार्थ विक्री करणारे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहे. खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असतांना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहे. अशा संतापजनक प्रतिक्रिया आता शहरावासीयांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. त्यामुळे व्यवसायात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे.
शहरातील हॉटेल, रेस्टोरंट, खानावडी, फास्ट फूड, चायनीज सेंटर, पावभाजी सेंटर, छोटी मोठी नाश्त्याची दुकाने तथा विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये सर्रास घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात आहे. व्यावसायिकांना व्यावसायिक सिलिंडर वापरणे अनिवार्य असतांना व्यावसायिक नियमांना धाब्यावर बसवून खुलेआम घरगुती गॅस सिलिंडर वापरतांना दिसत आहेत. व्यवसायाकरिता १९ किलो वजनाचे व्यावसायिक सिलिंडर वापरने बंधनकारक आहे. परंतु या सिलिंडरच्या किंमती प्रचंड वाढल्याने व्यावसायिकांनी आपला मोर्चा घरगुती गॅस सिलिंडरकडे वळवला आहे. हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर वाढला आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे. घरगुती गॅस सिलिंडर व व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी तफावत असल्याने व्यावसायिकांनी घरगुती गॅस वापरण्याचा सपाटा लावला आहे. व्यावसायिकांनी घरगुती गॅसचा वापर सुरु केल्याने घरगुती सिलिंडरधारकांना सिलिंडरच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. एवढेच नाही तर व्यावसायिक हे घरगुती गॅस सिलिंडर वापरत असल्याने घरगुती सिलिंडरच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. खाद्यपदार्थ व्यवसायात राजरोसपणे घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असतांना संबंधित अधिकारी मात्र आंधळेपणाचं सोंग घेऊन बसले आहेत. त्यांची खुर्चीच सुटत नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढले आहेत. मोबाईल हाताळण्यातच त्यांचा अर्धवेळ निघून जातो. आणि अर्धवेळ गप्पा हाकण्यात. त्यामुळे संबंधित विभाग हा उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम करीत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया शहरवासियांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. तेंव्हा याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सामान्य जनतेतून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment