Breaking News!! वागदरा गावालगत निर्गुडा नदी काठावरील झुडपात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहारालगत असलेल्या वागदरा गावाजवळून वाहणाऱ्या निर्गुडा नदी काठावरील रामघाट बंधाऱ्याच्या खालील भागात घनदाट झुडपात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरपण गोळा करण्याकरिता जंगल शिवारात गेलेल्या महिलांना झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर हा उलगडा झाला. अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. घनदाट झुडपात झाडाला लटकलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात विविध चर्चेला उधाण आले असून नागरिकांमधून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. युवकाचा चेहरा स्पष्टपणे ओळखू येत नसल्याने तो कोण व कुठला हे अद्याप कळू शकले नाही. घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
वागदरा येथून वाहणाऱ्या निर्गुडा नदी काठावरील घनदाट झुडपात सरपण गोळा करण्याकरिता गेलेल्या काही महिलांना झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. नंतर ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. घनदाट झुडपात झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याने मृतकाचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत नव्हता. त्यामुळे तो कोण व कुठला हे अद्याप कळू शकले नाही. घनदाट झुडपात दोरीने लटकलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. तसेच नागरिकांमधून वेगवेगळे तर्क वितर्कही लावले जात आहे. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिस तपासातूनच सत्य काय ते समोर येणार आहे.
Comments
Post a Comment