शारीरिक संबंधातून अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती, नराधमाला पोलिसांनी केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्यावर अकाली मातृत्व लादणाऱ्या नराधमाविरुद्ध मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात शिक्षण घेतांना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर विविध प्रलोभने व आमिषे दाखवून तसेच तिच्यात प्रेमाचा विश्वास जागवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने वेळोवेळी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाली असून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याबाबत मुलीच्या आईने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या त्या नराधमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोरगाव पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षाच्या मुलीशी ओळख वाढवून आरोपीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याने तिच्याशी जवळीक साधत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आई वडील कामधंद्याला गेले की, तो तिला भेटायला यायचा. प्रेमाची ग्वाही देऊन व तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन तो तिच्याकडून आपली वासना भागवायचा. अनेक दिवस त्याने भूलथापा देऊन तिचं शारीरिक शोषण केलं. अशातच काही दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागलं. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे तिची तपासणी केल्यानंतर तिला दिवस गेल्याचे सांगण्यात आले. ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आई वडिलांना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्या सोबत घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हे गंभीर वास्तव पुढे आले. मुलीने सांगितलेल्या किळसवाण्या प्रकाराने व्यथित झालेल्या आई वडिलांनी सरळ मारेगाव पोलिस स्टेशन गाठले. मुलीच्या आईने घडलेल्या प्रकाराबाबत रीतसर तक्रार नोंदविली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मारेगाव पोलिसांनी लगेच मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेत अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या संजय विलास जुमनाके (२२) या नराधमाविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२)(F)(N), ५०६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच तात्काळ आरोपीला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment