वणी व अडेगाव येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी 

स्वराज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती भारतात नाही तर संपूर्ण जगात पसरली आहे. शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानल्या जातं. त्यांची जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते. यावर्षी त्यांचा जयंती उत्सव भारतात धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येत असतांना वणी व झरी तालुक्यातील अडेगाव येथेही त्यांच्या जयंती उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. अडेगाव येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवजन्मोत्सव आयोजन समितीच्या वतीने १८ व १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर वणी येथे शिव स्वराज्य मंच द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोउत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थ चौक येथे १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

वणी येथिल शिवतीर्थ चौक येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जय जगन्नाथ मल्टी क्रेडिट को-ऑप. सोसा. लि. वणीचे अध्यक्ष संजय खाडे हे राहणार असून सोहळ्याचं उद्घाटन विजय चोरडिया यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर, मनिष बत्रा, शिरपूरचे माजी सरपंच जगदीश बोरपे यांची तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अ.नु.वि. यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय नगराळे,  भारई समाज अध्यक्ष गणेश धानोरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वाघदरकर, न.प. चे माजी सभापती संतोष डंभारे, अशोक गायकवाड, पियुष लाठीवाला यांची उपस्थिती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात होणार आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता शिवाजी महाराजांचा अभिषेक होणार असून ८ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. 

अडेगाव येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात १८ व १९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पणन महासंघ मुंबईचे संचालक संजय खाडे हे राहतील. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवजन्मोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष नितेश ठाकरे हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, ठाणेदार मनवर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार वामनराव कासावार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता सप्त खंजेरी वादक पवनपाल महाराजांचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष केतन ठाकरे हे राहतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष झाडे हे राहणार आहेत. यावेळी शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता महिला सक्षमीकरण व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर प्रसिद्ध व्याख्यानकार तेजस्विनी गव्हाणे यांचं जाहीर व्याख्यान होणार आहे. वणी व अडेगाव येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी