शहरात दोन दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर

प्रशांत चंदनखेडे वणी 

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) व यवतमाळ जिल्हा समता सैनिक दल यांच्या विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील भिमनगर येथे दोन दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिराला उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष (यवतमाळ पूर्व) भगवान इंगळे उपस्थित राहणार आहेत. तर शिबिराच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी भा. बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रविण वनकर हे पार पडणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष रवि भगत, संरक्षण उपाध्यक्ष गौतम माळखेडे, संरक्षण सचिव प्रा. डॉ. उत्तम शेंडे, प्रा. अन्ना मुन, प्रा. गोरखनाथ पाटील, शिक्षिका प्रतिमा रामटेके, शिक्षिका पुष्पलता बोंदाडे, मंगला इंगळे, सुमित्रा जंगले, कळंब तालुकाध्यक्ष नारायण बुरबुरे, झरी तालुकाध्यक्ष सुधाकर नरांजे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कें. शिक्षक मोरेश्वर देवतळे करतील. तर सूत्र संचालन कें. शिक्षिका वैशाली पाटील, सचिन वानखेडे, प्रांजल वनकर करणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक मेजर रविंद्र पंचांग (अकोला) व सह प्रशिक्षक मीना झिने (जालना) हे राहतील. १८ व १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर चालणार आहे. 

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. घराघरात एक सैनिक तयार व्हावा हा दृष्टीकोन ठेऊन तालुक्यात एक हजार सैनिक तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन शहरात समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतःचं संरक्षण करण्यास स्वतःच सक्षम व्हावं, हा या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या शिबिराचा युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा तथा जनतेने या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.   


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी