एलसीबी पथकाने सुगंधित तंबाखूची तस्करी रोखली, सुगंधित तंबाखू तस्करांवरील आठ दिवसातील ही दुसरी कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी 

सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर शासनाने बंदी आणलेली असतांनाही शहरासह तालुक्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखूचा साठा करून चोरून लपून त्याची विक्री केली जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. विविध शक्कली लढवून सुगंधित तंबाखूची तस्करी करणारे तालुक्यात सक्रिय आहे. सुगंधित तंबाखूच्या तस्करीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेकांनी तस्करीच्या या काळ्या धंद्यात उडी घेतली आहे. त्यामुळे सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीचा हा गोरखधंदा तालुक्यात जोमात सुरु आहे. दूध वितरणाच्या वाहनातून सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच स्थानिक गुन्हे शाखा पथकानेही सुगंधित तंबाखूची तस्करी रोखून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. मोटरसायकलने सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या आरोपीला एलसीबी पथकाने सापळा रचून अटक केली. ही धडक कार्यवाही १७ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजता करण्यात आली. १८ फेब्रुवारीला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण करून सुगंधित तंबाखूचा साठा तपासण्यात आला. नंतर त्यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कार्यवाहीत एलसीबी पथकाने १ लाख ८८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक वणी येथे कार्यरत असतांना त्यांना मोटरसायकलने सुगंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिलाली. या माहितीच्या आधारे पथकाने कायर मुकुटबन मार्गावरील पठारपूर फाट्याजवळ सापळा रचला. काही वेळातच त्यांना या मार्गाने एक दुचाकी येतांना दिसली. त्यांनी दुचाकी थांबवून दुचाकी चालकाला त्याचे नाव विचारले असता त्यांने नितीन कवडू राजूरकर (३२) रा. नेरड (पुरड) असे सांगितले. पथकाने दुचाकीवरील पांढऱ्या रंगाच्या पोत्यात काय आहे, अशी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे एलसीबी पथकाने दुचाकीवरील पोत्याची तपासणी केली. पथकाला त्या पोत्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तो हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैध विक्री करीता नेत होता. पथकाने त्याच्या जवळून सुगंधित तंबाखूचे २०० ग्राम वजनाचे १५० पॉकिट, ४०० ग्राम वजनाचे १४ पॉकिट तथा मोटरसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ८८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी नितीन कवडू राजूरकर याला अटक केली. त्याच्यावर अन्न सुरक्षा मानके व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी