शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे यांचं निधन
प्रशांत चंदनखेडे वणी
शेतकरी शिक्षण संस्था तथा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगावचे अध्यक्ष तसेच जगन्नाथ महाराज शिक्षण संस्थेचे संचालक जिवन पाटील कापसे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. आज १९ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता मारेगाव येथील त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
मारेगाव येथील प्रतिष्ठित व्यक्ती असलेले जीवन पाटील कापसे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यात घालवलं. राजकारणातही ते सक्रिय होते. काँग्रेस पक्षात त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घालविली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. मारेगाव येथे महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणातील अडचणी दूर केल्या. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिलेले जीवन पाटील कापसे यांचं अचानक दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे. दुपारी ४ वाजता त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
Comments
Post a Comment