गंभीर गुह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना आले यश, मागील ७ महिन्यांपासून तो देत होता चकमा
प्रशांत चंदनखेडे वणी
एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. परंतु वेळोवेळी तो पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिस त्याच्या शोधात असतांनाच शेवटी तो पोलिसांना गवसला. त्याचा सुगावा लागताच शिव जयंतीचा बंदोबस्त आटपून पोलिस पथक चंद्रपूरला रवाना झालं. पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या या आरोपीवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मागील ६ ते ७ महिन्यांपासून पोलिसांना तो चकमा देत होता. मात्र एपीआय माधव शिंदे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून त्याचा शोध लावला. आजम शेख बाबा शेख (२७) रा. दुर्गापूर जि. चंद्रपूर असे या पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. एपीआय माधव शिंदे यांनी तर्कशुद्ध पद्धतीने तपास करून अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे. तसेच अट्टल गुन्हेगारांना तुरुंगवारी घडविली आहे.
वणी शहरालगत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली होती. पोलिसांनी प्रकरणाचा शीघ्र तपास करून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक केली होती. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, तथा भादंविच्या कलम ३६३, ३६६, ३७६(३), ३७६(२)(n) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यात आरोपीला सहकार्य करणारा त्याचा नातेवाईक आजम शेख बाबा शेख हा तेंव्हापासून पसार होता. ११ जुलै पासून पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतु तो पोलिसांना चकमा देऊन पळ काढत होता.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आपल्या जवळच्या नातेवाईकाला बाबा आजम याने आश्रय दिला. अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यातही त्याने आपल्या नातेवाईकाला पुरेपूर मदत केली. मुलीला पळवून नेण्यात नातेवाईकाला पूर्ण सहयोग करणारा आजम शेख हा मुख्य आरोपीच्या अटकेनंतर पसार झाला होता. पोलिस त्याचा मागील सहा ते सात महिन्यांपासून कसून शोध घेत होते. शेवटी २० फेब्रुवारीला तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी आजम शेख हा दुर्गापूरला असल्याची खबऱ्यांकडून माहिती मिळताच एपीआय माधव शिंदे यांच्या नेतृत्वात तडक पोलिस पथक दुर्गापूरला रवाना झालं. आणि मोठ्या शिताफीने आजम शेख या फरार आरोपीला अटक केली. त्याच्यावर बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तथा भादंविच्या ३६३, ३६६ यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या आदेशावरून एपीआय माधव शिंदे, सपोनि झाडोकर,पोहेकॉ विजय वानखेडे, शुभम सोनुले, गजानन कुडमेथे यांनी केली.
Comments
Post a Comment