संजय देरकर हे शिवसेना (उ.बा.ठा.) वणी विधानसभेच्या प्रमुख पदावर
प्रशांत चंदनखेडे वणी
शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर संजय देरकर यांच्या रूपाने वणी विधानसभा क्षेत्राला खंबीर नेतृत्व मिळालं. शिवसेना नेते म्हणून संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्या व प्रश्न मार्गी लावले. बेरोजगार युवकांचे रोजगाराचे प्रश्न सोडविले. गरजू गरिबांना मदतीचा हात दिला. अनेक सामाजिक व सेवाभावी उपक्रम देखील राबविले. अन्यायाविरुद्ध प्रखरतेने आवाज उठविणारं कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून पक्षात त्यांचं स्थान निर्माण झालं. एवढेच नाही तर पक्ष बांधणी व पक्ष संघटन वाढविण्यावरही त्यांनी नेहमी भर दिला. वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचं प्राबल्य वाढविण्याकरिता त्यांच्या नेतृत्वात शिवसैनिक तयार होऊ लागले. संजय देरकर यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर शिवसेना (उ.बा.ठा.) वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे.संजय देरकर हे वणी नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष असून त्यांना वणी विधानसभा क्षेत्राचाही दांडगा अनुभव आहे. त्यांनी अनेकदा वणी विधासभा क्षेत्राची निवडणूक देखील लढविली आहे. त्यांचा वणी विधानसभा क्षेत्रातील संपर्कही व्यापक आहे. तळागाळातील निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्याशी जुळलेले आहेत. शोषित व वंचित घटकांसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. सर्वसामान्यांशी जुळलेला नेता म्हणून त्यांना वणी विधानसभा क्षेत्रात ओळखले जाते. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर तथा बेरोजगारांचे प्रश्न व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी वेळप्रसंगी आंदोलनात्मक पवित्राही घेतला आहे. सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कांसाठी त्यांनी खंबीरपणे पुढाकार घेतला. सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेण्यास शासन, प्रशासनालाही भाग पाडले. जनतेसाठी निस्वार्थ कार्य करीत असतांनाच संजय देरकर यांनी शिवसेनेत (उ.बा.ठा.) जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिला. घरोघरी शिवसैनिक हे अभियान राबवून त्यांनी निष्ठावान शिवसैनिक तयार केले. त्यामुळे संजय देरकर यांची पक्षनिष्ठा व त्यांची कार्यतत्परता पाहून पक्षश्रेष्ठींनी २७ फेब्रुवारीला त्यांची शिवसेनेच्या वणी विधानसभा प्रमुख पदावर निवड केली आहे. पक्षाने त्यांच्यावर सोपविलेल्या जाबदारीची जाणीव ठेऊन यापुढेही तेवढ्याच निष्ठेने पक्षाचे कार्य व पक्ष संघठन वाढविण्याला प्राधान्य देणार असल्याचे संजय देरकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले. निष्ठावान शिवसैनिकांची सांगड घालून येणाऱ्या काळात शिवसेना (उ.बा.ठा.) वणी विधानसभा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments
Post a Comment