अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून फरार झालेला आरोपी जेरबंद

प्रशांत चंदनखेडे वणी 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध लावून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती प्रेम लादु पाहणाऱ्या या आरोपीने तिचा हात पकडून विनयभंग केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस त्याला अटक करण्याकरिता गेले असता तो फरार झाल्याचे सांगण्यात आले. तेंव्हा पासून पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. शेवटी तो राहत असलेल्या गावातूनच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदेश तिखट (२५) रा. बोधेनगर, चिखलगाव असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ११ फेब्रुवारीला आरोपी विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार झाला. तेंव्हा पासून पोलिस त्याचा शोध घेत होते. शेवटी आज २९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी चिखलगाव येथून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. 

तालुक्यातीलच एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा आरोपी संदेश तिखट याने विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला नोंदविली होती. या तक्रारी वरून पोलिस त्याला अटक करण्याकरिता गेले असता तो फरार झाल्याचे पोलिसांना समजले. तेंव्हा पासून पोलिस त्याच्या मागावर होते. आरोपी हा अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता. तो जबरदस्ती तिच्यावर प्रेम लादू पाहत होता. तू माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी दुसऱ्या कुणासोबतही तुझं लग्न होऊ देणार नाही, असा फिल्मी स्टाईल प्रेमाचा जागर करणाऱ्या मजनूला जेंव्हा मुलीने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तेंव्हा एकतर्फी प्रेमातुन भावना अनावर झालेल्या या मजनूने मुलीला राम शेवाळकर परिसर येथे गाठून तिचा हात पकडला, आणि तिच्याकडे आपलं प्रेम स्विकार करण्याचा आग्रह धरला. वर्दळीच्या ठिकाणी आरोपीने गैरवर्तन करून लज्जास्पद प्रकार केल्याने मुलीने कुटुंबियांसह सरळ पोलिस स्टेशन गाठले. आरोपीने मुलीचा विनयभंग केल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिस आरोपीला अटक करण्याकरिता गेले असता तो फरार झाल्याचे पोलिसांना कळाले. ११ फेब्रुवारी पासून फरार असलेल्या या आरोपीला अटक करण्यात शेवटी पोलिसांना यश आले आहे. आरोपी संदेश तिखट हा गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चिखलगाव येथून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. त्याच्यावर भादंविच्या कलम ३५४ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. सदर कार्यवाही ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या आदेशावरून डीबी पथकाने केली. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी