अनिल बेहराणी आहेत वणी पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार, त्यांच्यापुढे गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे असेल आव्हान
प्रशांत चंदनखेडे वणी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्यात बदल्यांचं सत्र सुरु झालं आहे. जिल्ह्यात ३ वर्ष कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याचे आदेश धडकल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या वणी पोलिस स्टेशनचाही समावेश आहे. येथिल कर्तव्यदक्ष ठाणेदार अजित जाधव यांची देखिल जिल्हा बदली करण्यात आल्याने वणी पोलिस स्टेशनला ठाणेदार म्हणून कुणाची वर्णी लागेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. परंतु आता बुलढाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल बेहराणी यांची येथे ठाणेदार म्हणून नियुक्ती झाल्याने मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या विविध नावांच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. ठाणेदार अनिल बेहराणी यांना वणी पोलिस स्टेशनचा प्रभार देण्यात आला आहे. वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणून अनिल बेहराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वणी पोलिस स्टेशनसाठी मोठी चढाओढ पहायला मिळते. याठिकाणी बदली करून घेण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले जातात. वणी पोलिस स्टेशनला ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळावी याकरिता तगडी फिल्डिंग लावली जाते. परंतु याठिकाणी कर्तव्यदक्ष व रुबाबदार ठाणेदाराची वर्णी लागावी अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. ठाणेदार अजित जाधव यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडला. वणी पोलिस स्टेशनचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण मिळवलं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर त्यांची वचक होती. परंतु निवडणुकीचा काळ असल्याने त्यांची जिल्हा बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर आता अनिल बेहराणी यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बेहराणी यांच्यावर वणी पोलिस स्टेशनचा प्रभार सोपविण्यात आला आहे. यापुढे नवनियुक्त ठाणेदार अनिल बेहरिया त्यांच्यावर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबादारी राहणार आहे. गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. अवैध धंद्यांबाबतही त्यांना कठोर पाऊले उचलावी लागणार आहे. अवैध धंदे करणारे व त्यांची पाठराखण करणारे पांढरपेशी यांच्याही त्यांना कुंडल्या तयार कराव्या लागणार आहे. शांत तालुका म्हणून या तालुक्याची ओळख असली तरी काही अपप्रवृत्ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रावर वचक ठेवण्याचंही मोठं आव्हान ठाणेदार अनिल बेहराणी यांच्यापुढे राहणार आहे. खनिज तस्करांनी याठिकाणी आपलं बस्तान मांडलं आहे. जिल्हातील व जिल्ह्याबाहेरील काही गुंड प्रवृत्तीचे लोक याठिकाणी ठिय्या मांडून आहेत. ते संघटित गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याही कुंडल्या शोधण्याचे मोठे आव्हान ठाणेदार अनिल बेहराणी यांच्यापुढे राहणार आहे. वणी पोलिस स्टेशनचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी व आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.

No comments: