Latest News

Latest News
Loading...

चिमुकल्या मुलीसह महिला घरून बेपत्ता

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील चौरिया ले-आऊट येथे वास्तव्यास असलेल्या मायलेकी घरून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना काल ४ फेब्रुवारीला उघडकीस आली. या मायलेकी अचानक घरून बेपत्ता झाल्याने कुटुंबं चिंतेत आलं आहे. या दोघींचाही नातलग व परिचितांकडे शोध घेतल्यानंतर महिलेच्या पतीने पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. खुशबू निलेश वाघमारे (२३) व ईरा निलेश वाघमारे (४) असे या घरून बेपत्ता झालेल्या मायलेकींची नावे आहेत. 

चौरिया ले-आऊट येथे सहकुटुंबं वास्तव्यास असलेल्या निलेश वाघमारे यांची पत्नी खुशबू वाघमारे ही आपल्या चिमुकल्या मुलीसह घरून बेपत्ता झाली. पत्नी न सांगता अचानक घरून निघून गेल्याने पती चांगलाच चिंतेत आला आहे. ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता मायलेकी घरून बेपत्ता झाल्या. पत्नी व मुलगी राहत्या घरून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच निलेश वाघमारे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेणे सुरु केले. परंतु त्यांचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने निलेश वाघमारे यांनी पत्नी व मुलगी घरून बेपत्ता झाल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. पोलिस खुशबू वाघमारे व ईरा वाघमारे यांचा शोध घेत आहेत. 

No comments:

Powered by Blogger.