शहरात वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा
प्रशांत चंदनखेडे वणी
वंचित बहुजन आघाडी वणी द्वारा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १० फेब्रुवारीला सकाळी १२ वाजता स्थानिक खंडोबा वाघोबा सभागृह (पोलिस स्टेशन जवळ) येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला वंचितचे जिल्हाध्यक्ष (यवतमाळ पूर्व) निरज वाघमारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बहुजन समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. बहुजन समाजात अनेक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना आपलं कार्य कौशल्य दाखविण्याची संधी मिळत नाही. या संदर्भात चर्चा घडवून आणण्याकरिता हा मेळावा घेण्यात येत आहे. देशातील आजची परिस्थिती लक्षात घेता बहुजन समाजातील शोषित व वंचित घटकांवर अन्याय व अत्याचार होऊ लागला. त्याचा प्रतिकार करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे. अन्यायायकारक परिस्थिती बदलण्याकरिता वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे बहुजनांचे संघटन बळकट करण्याकरिता हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या मेळाव्याला वणी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी वणीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment