नवरगाव धरणाजवळ संशयास्पद स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी 

मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नवरगाव धरण परिसरातील झुडपात आज एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. वणी तालुक्यातील रासा येथील रहिवाशी असलेल्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेहाजवळ विषारी औषध आढळल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रज्योत भिमराव मुन (२१) असे या मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मारेगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. २६ मार्चला तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला व २७ मार्चला सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आल्याने कुटुंबं पुरतं हादरलं आहे. त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा कयास वर्तविला जात आहे. 

वणी तालुक्यातील रासा या गावात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ मृतदेह आढळून आला. प्रज्योत भिमराव मुन असे या मृतक तरुणाचे नाव आहे. तो मारेगाव येथे शिक्षण घेत असल्याचे समजते. वणी येथे एका इलेक्ट्रिक दुकानात त्याची कामासाठी बोलणी झाली होती. कामाचा पहिला दिवस असल्याचे सांगून तो कामावर जाण्यासाठी घरून निघाला. परंतु २७ मार्चला सकाळी नवरगाव धरणाजवळ झुडपात त्याचा मृतदेहच आढळून आला. मृतदेहाजवळ स्कुल बॅग, मोबाईल, दोन ग्लास व दुचाकी आढळून आली. मात्र प्रज्योत हा घरून स्कुल बॅग घेऊनच गेला नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मृतदेहाजवळ विषारी द्रव्याची बॉटल आढळून आल्याने त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु तरुणाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून पोलिस त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तरुणाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समोर येईल. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे. मृतक प्रज्योत याच्या पश्च्यात आई, वडील व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. तरुणाच्या अशा या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी