संजय देरकर यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा शिवसेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात शहरात नुकताच शिवसेनेचा (उ.बा.ठा) पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी असंख्य युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सोहळ्याला युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. शिवसेनेत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असून निष्ठावंतांचा भरणा असणारा व त्यांची अस्मिता जपणारा हा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा हा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना समानतेची वागणूक देतानाच कार्यकर्त्यांची विश्वासाहर्ता टिकवून ठेवणारा हा पक्ष आहे. आणि म्हणूनच आजही निष्ठावान कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी जुळलेले आहेत.
वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचं प्राबल्य आजही कायम असून निष्ठावान शिवसैनीकांच्या निस्वार्थी कार्यावर ताकदीने उभा राहणारा हा पक्ष आहे. शिवसैनिकांनी नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे. नागरिकांच्या समस्या व प्रश्न उचलून धरत ते मार्गी लावले आहेत. शासन, प्रशासनाच्या अन्यायकारी धोरणांवर प्रहार करून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. तळागाळातील लोकांवर अत्याचार झाल्यास शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. विश्वासघातकी परिस्थीतूनही उभारी घेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आजही भक्कमपणे उभी राहिली आहे. कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. वणी विधानसभा क्षेत्रातील अनुभवी राजकारणी मानल्या जाणाऱ्या संजय देरकर यांच्यावर विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने शिवसैनिकांत आणखीच उत्साह संचारला आहे. शिवसैनिक आणखी जोमाने कामाला लागले आहेत. संजय देरकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून जनसंपर्क मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. सध्या ते पक्षबांधणी करण्यात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. वणी विधानसभा क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव असून त्यांनी पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु केला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जनमाणूस शिवसेनेकडे वळू लागला आहे. युवकांचाही शिवसेनेकडे कल वाढू लागला आहे. संजय देरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात असंख्य युवकांनी शिवसेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश केला. त्यांच्या पदनियुक्तीने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य जागलं आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांना साथ लाभल्याने युवकांचं संगठन मजबूत होऊन पक्षाला अधिक बळकटी मिळाली आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्याला युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचंही मोठं योगदान लाभलं. तसेच सुधीर ठेंगणे व रवि बोढेकर या शिवसैनिकांचं विशेष सहकार्य लाभलं आहे. यावेळी आकाश पेंदोर, मयूर निब्रड, वसीम शेख, प्रकाश कांबळे, अशपाक शेख, तौसिफ खान, अक्षय पथाडे, तौसिफ शेख, विजय पेंदोर, विफेश साळुके, उमेश नरपांडे, आकाश मदाकलवार यांच्यासह असंख्य युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता पक्षाचे गौतम सुराणा, जगन जुनगरी, विनोद दुमने, संतोष राजूरकर, हरी कार्लेकर, शिवराज दुमणे,चेतन उलमाले, ऋषी काकडे, प्रशांत बल्की यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment